सामान्य गृहिणी ते उद्योजिका, सरपंच: एक फलदायी प्रवास 

0
868
एका यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते असे म्हटले जाते. तसेच एका यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुषअसूच शकतो हे शिल्पाची यशोगाथा समजून घेतल्यानंतर लक्षात येते. 

रत्नागिरीची ४३ वर्षीय गृहिणी शिल्पा सुर्वे (Shilpa Surve) हिला व्यवसायाची प्रेरणा घरतूनच मिळाली पण तिलानवी दृष्टी आणि मोठी उद्योजिका म्हणून महाराष्ट्राला खरी ओळख दिली ती महाराष्ट्र आर्थिकविकास महामंडळाने (माविम), हे ती अभिमानाने सांगते.

एका सर्वसामान्य कुटुंबात लाहाणाची मोठी झालेल्या शिल्पाने थोरामोठ्यांकडून संस्कार आणिमार्गदर्शन घेतले. वयात आल्यावर घरच्यांनी लग्न लावून दिले आणि माहेराप्रमाणे सासरही तिनेआपलेसे केले. शिल्पाचे दिवंगत सासरे प्रभाकर सुर्वे यांनी तिला स्वातंत्र्याचा महत्वपूर्ण धडा दिला. त्यांनीच प्रेरणा दिल्याने शिल्पाने उद्योजक बणण्याचे स्वप्न उराशी बाळगले आणि व्यवसायात उडीघेतली. तिने मोठी उद्योजिका व्हावे तसेच सामाजिक कार्यास हातभार लावावा, हे त्यांनी पाहिलेलेस्वप्न प्रत्यक्षात उतरले. आज शिल्पाचे वार्षिक उत्पन्न १० लाख रुपायांहून अधिक आहे. ती अनेकमहिला आणि पुरुषांना रोजगार देऊन अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देते. तीने सामान्य गृहिणी ते गावची सरपंच असा प्रवास केला आणि अर्थातच याचे श्रेय ती माविमला देते.

कोकणातील रत्नागिरी हे आंबा उत्पादनासाठी प्रसिद्ध, पण अतिरिक्त उत्पादन झाल्यास गावातसाठवणुकीची पुरेशी व्यवस्था नसल्याने ते आंबे शिल्पाच्या घरी जमा व्हायला लागले. आंबे नुसतेजमा करून वाया जण्यापेक्षा त्याचा टिकाऊ पल्प बनवायला तिने सुरुवात केली. सांसऱ्यांच्यासल्ल्यानुसार शिल्पा तो पल्प तिच्या गावात विकू लागली. सुरुवातीला तिने घरगुतीस्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या मिक्सर-ग्राइंडरचा वापर केला आणि काही काळ त्यावरचअवलंबून होती, ज्यामुळे तिच्या पल्प उत्पादन क्षमतेला मर्यादा येत होत्या.

२००६ मध्ये तिच्या गावी आलेल्या सहयोगिनींनी शिल्पाची ओळख माविमशी करून दिली. माविमच्या बचत गटात सहभागी होण्यापूर्वी मिक्सर-ग्राइंडर वापरून दिवसभरात फक्त पाच-सहातास काम करू शकत होती आणि त्यात ती आंब्याच्या हंगामात दोन महिन्यांत केवळ ३०० बाटल्यापल्प तयार करत होती. आता तिच्या उत्पादनात लक्षणीय वाढ व्हायला सुरुवात झाली. यावरूनतिला योग्य मार्गदर्शनाचे महत्व पटले आणि तिला पुढे एक तरुण उद्योजिका बनण्याचा मार्ग सुकर झाला.

महिला बचत गटात सक्रिय सहभाग आणि वेळोवेळी विविध प्रशिक्षण कार्यशाळांना उपस्थितराहिल्याने तिच्यातील उद्योजिकेच्या विचारांना पोशक आहार मिळाला आणि तिच्या मनाच्याआणि प्रगतीच्या वाटा रूंदवत गेल्या. शिल्पाने स्वतःचा ‘सोनल प्रॉडक्ट्स’ नावाचा ब्रॅंड बाजारातआणला. माविमने उपलब्ध करून दिलेल्या पल्परच्या सहाय्याने तिने तीचा व्यवसाय, उत्पादनाचीगती वाढवली. परिणामी, तिची टीम आता ३०० ऐवजी ८०० बाटल्या पल्प तयार करून पॅक करूलागली. ज्यामुळे तिच्या उत्पादनात आणि नफ्यात लक्षणीय वाढ झाली. शिल्पाने सांगितले की,तिला पल्पर मशीनच्या एकूण किमतीपैकी केवळ २५ टक्के हिस्सा उचलायचा होता तर उर्वरितमशीनच्या खर्चाचा भार माविमने उचलला होता. अशाप्रकारे माविमने केवळ मार्गदर्शनच केले नाहीतर उद्योजिका बनविण्यास आर्थिक पाठबळही दिले होते.

आंब्याचा पल्प बनविण्यापासून व्यवसायाची सुरुवात करणाऱ्या सूक्ष्म उद्योजिकेने लोणचे उद्योगहीसुरू केला. त्यासाठी तिने दोन लाख रुपये कर्ज घेतळले. माविमने तिला बाजारपेठ उपलब्ध करून दिली आणि थेट ग्राहकांशी जोडले. “अनेक घरगुती उत्पादनांमुळे आंबा उत्पादनांला स्थानिकपातळीवर मागणी नसतानाही माविमने नवीन बाजारपेठांचे दरवाजे उघडले, अनेक ठिकाणीकार्यक्रम आयोजित केले, व्यापार मेळावे आयोजित करून त्यात सहभागी करून घेतले. स्टॉल्सच्या माध्यमातून आमचा व्यवसाय सक्षम करण्यास मदत केली,” असे शिल्पाने सांगितले.

माविमच्या प्रशिक्षणामुळे शिल्पाला ग्राहकांची नस चांगली ओळखता येऊ लागली. ग्राहकांना कायहवं नको हे ओळखून तिने आपल्या व्ययसायात तसे बदल करण्यास सुरुवात केली.

उदयजिका शिल्पाच्या प्रवासाला महत्त्वपूर्ण वळण मिळाले ते कोल्हापुरात माविमने आयोजितकेलेल्या जत्रेत तिथे ती सहभागी झाली. तिच्या कृषी उत्पादनातून मिळणाऱ्या नफ्यातून तिनेगारमेंटच्या व्यवसायात पाऊल टाकले. दिवाळी, गणेश चतुर्थीयांसारख्या सणांमध्ये, ती मुंबईआणि सुरत येथून घाऊक बाजारतून माल आणून पूरक व्ययसाय सुरू केला आणि दिवसागणिकतिच्या उत्पन्नात वाढ होत गेली.
“मी स्वतःला भाग्यवान समजते की मला एक समजूतदार आणि प्रोत्साहन देणारा पती लाभला. व्ययवसाय करायचा तर अनेक आव्हानांना सामोरे जाणे भाग असते. अशावेळी पतीची साथ हीमोलाची ठरते. अनेकदा उत्पादनांना अपेक्षित ग्राहक न मिळाल्याने उत्पादने विक्री पुरेशी होत नाही. अशा परिस्थितीत माझ्या पतीने तक्रारीचा सूर कधीही काढला नाही, उलट मला आधार दिला आणि आत्मविश्वास वाढवला,” असे तिने आवर्जून सांगितले.

शिल्पाचा उद्योजिका म्हणून गावात आदर वाढत गेला. तिच्या व्यवसायाची चर्चा पंचक्रोशीतपसरली. तिच्या शब्दाला मान-सन्मान मिळू लागला. काही महिन्यातच टोनाडे या तिच्या गावातीलज्येष्ठ मंडळीनी शिल्पाकडे त्यांच्या गावातील सरपंचपद स्वीकारण्याची विनंती केली. तिच्यासारयऱ्यांचीही ती इच्छा होतीच. त्यांची ती इच्छा २०१७ मध्ये पूर्ण झाली. “अगोदर, माझाराजकारणाकडे कल नव्हता, पण गावकऱ्यांनी मला हे पद स्वीकारण्याचा आग्रह धरला आणि मीनाही म्हणू शकले नाही. माविमच्या प्रशिक्षणातून आत्मसात केलेल्या जबाबदाऱ्या पेलण्याचीआणि ती प्रभावीपणे पार पाडण्याची माझी हातोटी पाहून, त्यांनी मला हे आव्हान आणि पदस्वीकारण्यास प्रवृत्त केले,” असे तिने स्पष्ट केले.

तिच्या कल्पकतेचा अनुभव काही दिवसातच दिसून आला. पावसाळ्यात गावातील ओढ्याला पूरयेणे काही नवे नव्हते. शिल्पाने पुढाकार घेऊन त्या ओढयावर पूल बांधण्याचे काम सुरू केले आणिगावकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. “आता या पुलामुळे मुसळधार पावसातही ओढा सहजओलांडून जाता येते. ज्यामुळे लोकांना त्यांच्या शेतापर्यंत कोणत्याही अडचणीशिवाय जाता येते. पावसाळ्यात धार्मिक समारंभासाठी आमच्या शेजारच्या गावात मोठ्या संख्येने येणाऱ्याभाविकांनाही यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे, ” शिल्पा म्हणाली.

बदलत्या हवामान परिस्थितीचा कृषी आणि त्यावर आधारित उत्पादनाचे नुकसान होते त्याबद्दलशिल्पाने चिंता व्यक्त केली आणि आवाज उठवला. तिच्यासारख्या कुटुंबांना या आव्हानांचा मोठाफटका सहन करावा लागतो. अनेकदा नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीची पुरेशी नुकसानभरपाईदेखील मिळत नाही.

“अलीकडेच, माविमने आमच्या बचत गटाच्या सदस्यांसाठी कर्नाटकात उद्योगजगतातील सर्वोत्तमसंधी जाणून घेण्यासाठी एक अभ्यास दौरा आयोजित केला. हा आमच्यासाठी खूप मोठा आणिचांगला अनुभव होता,” ती म्हणाली.

मावीम महिला उद्योजकांना वित्त आणि विपणनाच्या संधी उपलब्ध करून देऊन, प्रभावी धोरणेविकसित करण्यात मदत करते. तसेच कष्टाची कामे कमी करून आणि बाजारातील गतिशीलतेशीजुळवून घेण्याची सुविधा पुरवून सर्वसमावेशक विकास साधण्यास मदत करते, असं विश्वासशिल्पाने व्यक्त केला.

पैसा, प्रसिद्धी आणि यशापलीकडे, शिल्पाला खऱ्या अर्थाने आनंद देणारी गोष्ट म्हणजे तिलालोकांशी जोडण्यासाठी उपलब्ध करून दिलेली संधी. “आर्थिक संसाधनांसह, मला कामासाठी, काहीतरी नवीन शिकण्यासाठी किंवा विश्रांतीसाठी प्रवास करण्याचे स्वातंत्र्य आहे. मला माझेक्षितिज आणि अनुभव आणखी उंचवायचे आहे,” अशा शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या. माविमसोबतचा तिचा प्रवास शिल्पासाठी अविश्वसनीयपणे फलदायी ठरला आहे.

शिल्पा म्हणाली, “माझा माविमसोबतचा प्रवास हा समर्थन, चिकाटी आणि सामुदायिकसहभागाच्या परिवर्तनीय शक्तीचे द्योतक ठरला आणि हेच शाश्वत उपजीविका आणिसर्वसमावेशक विकासाला चालना देण्यासाठी संस्थेची बांधिलकी अधोरेखित करतो. आज मीआणि माझे कुटुंब स्वाभिमानाने, ताठ मानेने उभे आहोत ते केवळ माविमचे माझ्या आयुष्यातयेण्यामुळे.”

Share this content: